
नाशिक | Nashik
महिशा सुरमदिनी म्हणून ओळख असलेल्या आंबेमातेचा जागर करण्याचा सन म्हणजे नवरात्रोत्सव. (Navratri Festival) या उत्सवात नऊ दिवस प्रत्येकामध्ये उत्साह भरलेला असतो. देवीची पूजा,अर्चा, आरती केल्यानंतर गरब्यासाठी ठेका धरला जातो.नवरात्रोत्सव भक्ती आणि उत्साहाचे प्रतीक आहेत. या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी स्पायडर मीडिया हाऊस आयोजित जय डेव्हलपर आणि अडावदकर ज्वेलर्स प्रस्तुत गरबा विथ रॉक बँड या संकल्पनेवर आधारित एक दिवसीय गरबा फेस्ट (Garba Fest) रविवार (दि.२२ ऑक्टोबर) रोजी आयोजित करण्यात आला आहे....
संध्याकाळी सहा वाजेपासून कार्यक्रमास सुरुवात होणार असून गरबा विथ रॉक बँड या नवीन संकल्पनेला नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नाशिकमधील (Nashik) प्रसिद्ध गरबा ग्रुपने आधीच नोंदणी देखील केली आहे. सदर कार्यक्रमात महिलांना सोनी पैठणी जिकंण्याची संधी मिळणार असून कार्यक्रमाला लोटसलँड व्हेनु पार्टनर, सोनी पैठणी गिफ्ट पार्टनर, स्पीड सुझुकी बाईक पार्टनर, नातू कॅटरस फूड पार्टनर, अबसोल्यूट फिटनेस पार्टनर, टीसीएस वर्ल्ड होलिडे ट्रॅव्हल पार्टनर, स्पोर्ट बझार ट्रॉफी पार्टनर तसेच अजनेय ज्योतिष केंद्र, जय स्पोर्ट, वेल्थ ग्रोथ हे अससोसिएट पार्टनर म्हणून लाभले आहेत.
दरम्यान, या कार्यक्रमात जास्तीत जास्त नाशिककरांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्पायडर मीडिया हाऊसच्या (Spider Media House) शरद धात्रक यांच्यातर्फे करण्यात आले आहे. तसेच नागरिकांना (Citizens) अधिक माहितीसाठी ९८९००१११२० या क्रमांकावर संपर्क देखील साधता येणार आहे.