‘एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ अभियान

‘एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ अभियान

ओझे । वार्ताहर | Oze

महाराष्ट्र शासनामार्फत (Government of Maharashtra) चालू असलेल्या ‘एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या अभियान अंतर्गत नाशिक जिल्हा (nashik district) अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ, दिंडोरी तालुका (dindori taluka) कृषी अधिकारी विजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चौसाळे येथे झाला.

कार्यक्रमात कृषी उपसंचालक शिरसाठ यांनी कृषी विभागाच्या (Department of Agriculture) आत्मा मार्फत राबविण्यात येणार्‍या शेतकरी बचतगट (Farmers Savings Group), शेतकरी उत्पादक कंपनी (Farmers Producers Company), गट शेती (group farming), सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (Micro food processing industry), कृषी यांत्रिकीकरण योजना (Agricultural Mechanization Scheme), सूक्ष्म सिंचन योजना (Micro Irrigation Scheme), ऑनलाइन अर्ज प्रक्रिया (Online application process) याबाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी गावातील रस्ता अपघाताने (road accident) मृत्यू झालेले शेतकरी कै. कांतीलाल जोपळे यांचे कुटुंबास त्यांनी भेट घेऊन सात्वन केले.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची (Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme) माहिती देऊन प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना केली. त्यानंतर कृषी विभागाच्या (Department of Agriculture) यांत्रिकीकरण योजनेचे अनुदान (subsidy) दिलेले यंत्र यातील श्रीमती चंद्रभागाबाई नारायण तुंगार यांचे ट्रॅक्टर व कांदा चाळ तसेच सम्राट यशवंत राऊत यांचे पलटी नांगर इतर परिसरातील विविध यंत्रांची तपासणी केली. भात व सोयाबीन पिकाची पाहणी केली शेतकर्‍यांनी विचारलेल्या शंकाचे निरासन केले.

शेतकरी (farmers) सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चौसाळे ग्रामपंचायतचे उपसरपंच हेमंत जोपळे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडल कृषी अधिकारी वणी, ललित सूर्यवंशी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक उत्तम भुसारे यांनी केले तर कृषी सहाय्यक संदीपकुमार बोरवे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रगतिशील शेतकरी नारायण तुंगार,

स्वस्त धान्य दुकानदार दौलत भरसट, पोलीसपाटील संदीप जोपळे, प्राथमिक शिक्षक गुलाब तुंगार, बँक प्रतिनिधी रविंद्र तुंगार, कृषिमित्र वसंत जोपळे, ग्रामसेवक दत्तात्रय गायकवाड, तलाठी पुनम गायकवाड यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक उत्तम भुसारे व कृषी सहाय्यक संदीपकुमार बोरवे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com