वीज पडून गाय दगावली; दोन दिवसात दुसरी घटना

वीज पडून गाय दगावली; दोन दिवसात दुसरी घटना

सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana

दुर्गापूर (Durgapur) येथील शेतकरी (Farmer) नारायण खंडू पवार (Narayan Pawar) (रा. करवंदे) यांच्या शेतात वीज (Lightning) पडून गाभण गाय (Cow) दगावल्याची घटना घडली आहे...

वडाचा माळ येथे विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरु होता. वीज अचानक गायीच्या अंगावर पडल्याने गायीचा मृत्यू झाला आहे.

यामुळे शेतकऱ्याचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे तलाठी प्रकाश कडाळे यांनी पंचनाम्यात म्हटले आहे.

तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किरण आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुचिकित्सक श्रीकांत पवार, भावेश देशमुख यांनी शवविच्छेदन केले. यावेळी पोलीस पाटील भागवत सहारे उपस्थित होते. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी करवंदे येथे वीज पडून दोन बैलांचा मृत्यू झाला होता.

Related Stories

No stories found.