मखमलाबाद येथे इमारतीवरुन उडी मारुन एकाची आत्महत्या

शांतीनगर परिसरातील घटना
मखमलाबाद येथे इमारतीवरुन उडी मारुन एकाची आत्महत्या
आत्महत्या

नाशिक । Nashik

मानसिक रुग्ण युवकाने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.१४) सायंकाळी मखमलाबाद येथील शांतीनगर परिसरात घडली.

एकनाथ बी. चव्हाण (३०) असे आत्महत्या करणार्‍या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ यांच्यावर मानसोपचार तज्ञाकडून उपचार सुरु होते. यातुनच हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com