नाशिक । Nashik

मद्याच्या नशेत एकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी (दि.14) रात्री होळकर चौकात घडली.

मनोज श्रावण आल्हाट (50 रा.बाबा किराणा जवळ,होळकर चौक) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. मनोज यास दारूचे व्यसन होते. गुरूवारी रात्री मद्याच्या नशेत त्यांनी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते.

ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक चौधरी करीत आहेत.