
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
उसनवार दिलेले पैसे (Money) परत मागितल्याचा राग आल्याने चार जणांनी एकाला बेदम मारहाण (Beaten) करत जखमी (Injured) केल्याची घटना भारतनगर (Bharatnagar) परिसरात घडली....
पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, राजू विठ्ठल म्हस्के (Raju Vitthal Mhaske) (४१, रा. नासर्डी पुलाजवळ, गिते मळा, मुंबई नाका, नाशिक) यांनी एकास पैसे (Money) उसने दिले होते.
म्हस्के यांनी ते पैसे परत मागितले असता त्याचा राग येवून संशयित लंका दिपक उजगरे (३०, रा. नासर्डी पुलाजवळ, गिते मळा, मुंबईनाका, नाशिक), सुरेखा उर्फ सोनी विभूते (१९), तुषार राजाराम जाधव (१९) यांनी हात चापटीने मारहाण केली तर दिपक दामू उजगरे (३५) याने लोखंडी रॉड म्हस्के यांच्या डोक्यात टाकून त्यांना जखमी केले.
याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात (Mumbainaka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक पाटील करत आहेत.