मद्यधुंद टवाळखोरांची एकास मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

मद्यधुंद टवाळखोरांची एकास मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

नवीन नाशिक | Nashik

नवीन नाशकात (Nashik) टिप्पर गॅंगची (Tipper Gang) दहशत संपते ना संपते तोच छोट्या-मोठ्या टवाळखोर गुंडांनी आपली दहशत माजवण्याचा प्रकार समोर येत आहे...

एकीकडे नाशकातील पोलीस (Nashik City Police) भाजप सेनेमध्ये पेटलेला वाद मिटवण्यासाठी बंदोबस्तात होते तर दुसरीकडे काल ( दि. 24 ) सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास अज्ञात दोन युवकांनी उत्तम नगर (Uttam Nagar Area) परिसरामध्ये येत रस्त्यावरील येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना तसेच महिलांना मद्यधुंद अवस्थेत मध्ये शिवीगाळ सुरू केली.

तसेच उत्तम नगर ते पवन नगर (Pawan nagar) दरम्यान जोरदार गाडी चालवत नागरिकांना शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळातच राजरत्न नगर येथे आपल्या घरी दळण घेऊन जात असलेले हर्षवर्धन उर्फ स्वप्नील चंद्रकांत पंगे यांना या दोन तरुणांनी विनाकारण बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

सदर प्रकारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजरत्न नगर परिसरात पंगे यांना मारहाण करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) झाला आहे. पोलिसांनी अशा अपप्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

दरम्यान याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com