पोळ्याच्या मिरवणुकीत एकावर कोयत्याने हल्ला

पोळ्याच्या मिरवणुकीत एकावर कोयत्याने हल्ला

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

जुन्या भांडणाची कुरापत काढून विहितगाव (Vihitgaon) येथे बैलपोळा (Bailpola Festival) मिरवणुकीत तीन जणांच्या टोळक्याने एकावर कोयत्याने हल्ला (Attack) करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

दर्शन शरद हंडोरे (Darshan Handore) (रा. हांडोरे मळा, विहितगाव) हा युवक विहितगाव येथील मारुती मंदिराजवळ असलेल्या पोळ्याच्या मिरवणुकीत असताना दुचाकीवर अनुप क्षीरसागर (Anup Kshirsagar) व त्याचे आणखी दोन साथीदार आले.

त्यांनी दर्शनबरोबर टिक टॉक (tiktok) व्हिडिओ बनवणे यावरून व कुठल्यातरी जुन्या भांडणाची कुरापत काढली. त्यानंतर शिवीगाळ करून अनुप याने आपल्याजवळ असलेला कोयता काढून दर्शन याच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात दर्शन याच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर (Nilesh Mainkar) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com