मखमलाबाद येथे रेमडेसिवीर ब्लॅकने विकणारा अटकेत

मखमलाबाद येथे रेमडेसिवीर ब्लॅकने विकणारा अटकेत

नाशिक | Nashik

रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. मयूर पितांबर सोनवणे असे संशयितचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट २ चे पथकाने मखमलाबादमध्ये ही कारवाई केली.

संशयिताच्या विरोधात म्हसरूळ पोलिस ठाण्यात अत्यावश्यक कायदा आणि सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तरुणाला बाधित वडिलांच्या उपचारासाठी इंजेक्शनची गरज भासत होती. मयूर सोनवणे नावाचा संशयित इंजेक्शन विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्याने संपर्क साधला असता २० हजार रुपयाने पाच इंजेक्शन देण्याचे सांगितले.

या तरुणाने गुन्हे शाखा युनिट २ चे बाळा नांद्रे यांना ही माहिती दिली. पथकाने तत्काळ कारवाईचे नियोजन केले. त्यानुसार मखमलाबाद गावात संशयिताला सापळा रचून ताब्यात घेतले. संशयिताकडून ५ रेमडेसिवीर, स्कूटर, मोबाइल, दोन हजारांची रोख रक्कम असा एकूण १ लाख १६ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक सुरेश साहेबराव देशमुख यांनी फिर्याद दिली.

ही कारवाई अभिजित सोनावणे, मिथुन म्हात्रे, विजय लोंढे, राजेंद्र घुमरे, यादव डांबले, गौरव गवळी, योगेश सानप, महेंद्र साळुंखे, संतोष माळोदे यांच्या पथकाने उपआयुक्त संजय बारकुंड, सहायक आयुक्त मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com