तलवारीने केक कापणे पडले महागात

तलवारीने केक कापणे पडले महागात

नाशिक । Nashik

'फादर्स डे' (Father's Day) च्या दिवशी तलवारीने (sword) केक कापणाऱ्या एका व्यक्तीला गुन्हे शाखा १ च्या पथकाने अटक (Arrested) करून त्याच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) गुन्हा दाखल (case Filed) केला आहे...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेशाखा युनिट क्र. १ चे अंमलदार महेश साळुंके यांना गुन्हे प्रतिबंधक गस्त दरम्यान खबऱ्यांमार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शांताराम गुरगुडे (Shantaram Gurgude) याने बेकायदेशीररित्या धारदार तलवार आणून त्या तलवारीने केक कापुन फादर डे साजरा केला असल्याची बातमी व फोटो मिळाले होते.

त्यानंतर ही माहिती वपोनी विजय ढमाळ (Vijay Dhamal) यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी विष्णु उगले,अंमलदार सुरेश माळोदे, प्रदीप म्हसदे,संदीप भांड,आसिफ तांबोळी, नाझिमखान पठाण, प्रशांत मरकड, महेश साळुंके, अण्णासाहेब गुंजाळ आदींच्या पथकाने फुलेनगर परिसरात (fulenagar area) शांताराम देवराम गुरगुडे (वय ४४) रा. घर नं. जी जी १२, फुलेनगर, तीन पतळया जवळ, पंचवटी, नाशिक (nashik) याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे तलवारीबाबत विचारणा केली असता त्याने त्याच्या घरातील पलंगाखालून तलवार पोलिसांच्या स्वाधीन केली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने (Crime Branch Squad) शांताराम याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com