महिला अत्याचार प्रकरणी पंचवटीत एकास अटक

महिला अत्याचार प्रकरणी पंचवटीत एकास अटक

नाशिक | Nashik

महिलेच्या घरात घुसून तीच्यावर अत्याचार करणार्‍या एकास पंचवटी पोलीसांनी अटक केली आहे.

रातु सिताराम आहिरे (४१, रा. मायेको दवाखान्याजवळ फुलेनगर, पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार अहिरे हा ९ एप्रिल रोजी मध्यरात्री पिडीतेच्या घरात घुसला. झोपेत असलेल्या पिडीतेवर त्याने जबरदस्तीने अत्याचार केले. तसेच कोणाला काही सांगीतल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास अटक करण्यात आली असून अधिक तपास उपनिरिक्षक पाटील करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com