नांदगाव | प्रतिनिधी

नांदगाव तालुक्यातील भौरी येथील तरुण शेतकरी जिभाऊ मधुुुकर गायकवाड यांची डोक्यात दगड घालून गुरुवारी क्रूर हत्या करण्यात आली होती. फ्रि फायर गेम्स खेळण्याचा व्यसनातून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे....

गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे, नांदगाव पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात आरोपींला गजाआड केले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 7 वाजेच्या सुमारास घराजवळच्या शेतामध्ये तरुण शेतकरी जिभाऊ मधुकर गायकवाड (वय 36) हा मयत आढळून आला. अज्ञात इसमांनी त्यांच्या डोक्यात व कानावर दगडाने घाव घालून हत्या करण्यात आली होती.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरुन गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे मयत जिभाऊ यांच्या सोबत घटनास्थळी असलेल्या संशयित सुनील शिवाजी मोरे रा.भौरी यास ताब्यात घेतले.

त्यास पोलीस खाक्या दाखवताच फ्रि फायर गेम्स खेळण्याचा व्यसनातून हत्या करण्यात आल्याची कबुली त्याने दिली.नांदगाव पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात आरोपींला गजाआड केले आहे.

याप्रकरणी गुन्हा उघडकीस पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसिंग साळवे, पोलीस निरीक्षक संतोष मटकुळे,आणि अधिक तपास अधिकारी उपनिरीक्षक सिध्दार्थ आहिरे करीत आहेत.