मोटरसायकली चोरणाऱ्याला अटक; १३ दुचाकी जप्त

मोटरसायकली चोरणाऱ्याला अटक; १३ दुचाकी जप्त

नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashik Road

नाशिक शहर व नाशिकरोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी गाड्या (Two wheelers) चोरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गाड्या चोरणाऱ्या आरोपींना (Accused) त्वरित अटक (Arrested) करून कारवाई करा असा आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांनी दिला होता. त्यानंतर नाशिकरोड पोलिसांनी याबाबत तातडीने कारवाई सुरू केली...

गेल्या महिन्यात नाशिकरोड रेल्वे बस स्टॅन्ड परिसरातून सागर जाधव यांची दुचाकी गाडी चोरी (Theft) गेली होती. त्यानंतर या संदर्भात त्यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) तक्रार दाखल केली होती.

या अनुषंगाने पोलिसांनी (Police) तपास सुरू केला असता परिमंडळ दोन कार्यालयात नेमणुकीस असलेले पोलीस नाईक विशाल पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की, गाडी चोरणारा संशयित योगेश शिवाजी दाभाडे राहणार अशोकनगर सातपूर हा रेल्वे स्टेशन परिसरात फिरत आहे.

यानंतर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यास शिताफीने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी शहर व परिसरातून चार लाख ८५ हजार रुपये किमतीच्या १३ मोटरसायकल जप्त केल्या.

दरम्यान, नाशिकरोड पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केल्याबद्दल पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी (Chandrakant Khandvi) सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.सिद्धेश्वर धुमाळ यांनी नाशिकरोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे,पोलीस निरीक्षक गणेश नायदे, राजू पाचोरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, हवालदार अविनाश देवरे,यांच्यासह आदी पोलिसांचे कौतुक करून अभिनंदन केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com