
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
महिलेची नजर चुकवून तिच्या एटीएम (ATM) मधून हजारो रुपयांची रक्कम काढून अपहार करणाऱ्या संशयितास (Suspect) भद्रकाली पोलिसांनी (Bhadrakali police) २४ तासांच्या आत तपास करत अटक (Arrested) केली आहे...
याबाबत सविस्तर वृत्त असे की, द्वारका परिसरातील (Dwarka area) स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) एटीएम मध्ये अर्चना श्रीराम रोकडे (Archana Shriram Rokade) (३५, फ्लॅट नंबर ४, अभंग अपार्टमेंट, नागजी चौक, नाशिक ) ह्या (दि.३) दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान एटीएमचा (ATM) नवीन पिनकोड (Pincode) जनरेट करण्यासाठी गेल्या होत्या.
यावेळी त्यांना एटीएममध्ये असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने मी तुमची मदत करतो असे भासवून त्यांची नजर चुकवून त्यांच्या एटीएम ऐवजी दुसरे एटीएम त्यांच्या ताब्यात दिले व त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करून त्यांच्या खात्यातून २३ हजार १०० रुपये ही रक्कम काढून अपहार (embezzling) केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) गुन्हा दाखल (case registered) करण्यात आला होता.
याप्रकरणी पोलीस आयुक्त (Commissioner of Police) जयंत नाईकनवरे (Jayant Naiknavare) उपायुक्त अमोल तांबे (Amol Tambe) सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना (Deepali Khanna) यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार भद्रकाली पोलिस ठाण्याचे वपोनी, दत्तात्रय पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि ज्ञानेश्वर मोहिते,अंमलदार विशाल काठे, कय्युम सैयद, संदिप शेळके, रमेश कोळी, लक्ष्मण ठेपणे, सागर निकुंभ, गोरख साळुंखे, संजय पोींदे, धनराज हासे, उत्तम खरपडे आदींच्या पथकाने घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही. फुटेज (CCTV) संशयितासारखे दिसणारे वर्णन व गुन्हा करण्याची पध्दत यावरून संशयित वरिंदर बिलबहादुर कौशल ( ४२,रा. जेलरोड, नाशिकरोड ) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
दरम्यान, पोलिसांनी संशयित वरिंदर बिलबहादुर कौशल (Suspect Varinder Bilbahadur Kaushal) याच्याकडून २३ हजार १०० रुपयांची रोकड हस्तगत केली. तसेच संशयित आरोपीस पोलिसांनी न्यायालयात (court) हजर केले असता न्यायालयाने त्यास ८ जून पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.