पाथर्डी परिसरात एटीएम फोडण्याचा प्रयत्न; एकास शिताफीने बेड्या
नाशिक

पाथर्डी परिसरात एटीएम फोडण्याचा प्रयत्न; एकास शिताफीने बेड्या

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

इंदिरानगर | वार्ताहर

पाथर्डी फाटा येथील ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिट मार्शल दिनेश पाटील रात्री दीड वाजेच्या सुमारास पाथर्डी फाटा परिसरात गस्त घालत असताना वडनेर पाथर्डी रस्त्याला लागुन असलेले ॲक्सिस बँकेच्या एटीएम चेक करण्यासाठी गेलेे असता एटीएमच्या शॉप मधून दोन इसम पोलिसांना पाहून वासन नगर च्या दिशेने पळाले.

पाटील यांनी त्यांचा पाठलाग केला असता चोरटे पळुन गेले. बीट मार्शल पाटील यांनी मदतीकरिता नियंत्रण कक्षला कळवले असता अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निंबाळकर इंदिरानगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश भामरे पीटर मोबाईल, सी आर मोबाईल, डीबी मोबाईल तसेच इंदिरानगर चे बीट मार्शल तसेच अंबड पोलिस स्टेशनचे कर्मचारी येथे पोहोचले.

सर्वांनी सदरच्या परिसरात चोरट्यांचा कसून शोध घेत असताना उद्यानाजवळ एक संशयित इसम लपलेला आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता रुपेश शिवाजी कहार (वय 21 वर्षे रा. कृष्णानगर ढोकणे मळा गोपाल पार्क अंबड) असे सांगितले.

त्याची अधिक चौकशी केली असता माझ्यासोबत चार मित्र होते आम्ही एटीएम मशीन तोडून त्यातील रोख रक्कम चोरी करण्याकरता आलेलो असल्याची कबुली त्याने दिली.

त्याच्याकडून गुन्ह्यात एटीएम फोडण्यासाठी वापरलेली साधने जप्त करण्यात आली तसेच इतर चार संशयितांचा नावे निष्पन्न झाली असून पोलीस शोध घेत आहेत.

ही कामगिरी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे व पो नि नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलिस ठाण्याचे पो नी निंबाळकर इंदिरानगर पोलीस ठाण्याचे स पो नि राकेश भामरे , पाळदे, अखलाक शेख, जावेद खान, बीट मार्शल दिनेश पाटील, किसन गिधाडे, अमोल सोनार किरण डुमणे,अंबड पोलिस स्टेशनचे डीबीचे कर्मचारी मारुती गायकवाड, हेमंत आहेर, यांच्या पथकाने केली.

याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात भादवि कलम 457, 380, 511, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाकीर शेख हे करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com