भाजप नगरसेवकास धमकी प्रकरणी संशयित अटकेत
नाशिक

भाजप नगरसेवकास धमकी प्रकरणी संशयित अटकेत

अंबड पोलिसांत गुन्हा दाखल

Gokul Pawar

Gokul Pawar

नवीन नाशिक | New Nashik

भाजपाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या घरासमोर जावून जीवेठार मारण्याची धमकी देणार्‍या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीसांनी संशयितास अटक केली आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाग 29 चे भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या घरासमोर मध्यरात्री दिडवाजेच्या सुमारास जावून सिद्धेश मथुरे याने हातात कोयता व बंदूक घेवून नगरसेवक शहाणे यांस जीवेठार मारण्याची धमकी दिली.

दरम्यान संशयित मथुरे हा काही दिवसांपूर्वी झालेल्या दरीमातोरी च्या प्रकरणातील पंचवटी( फुलेनगर) येथील डिजे वाजविणार्‍या मुलांना डांबवून ठेवण्याच्या गुन्ह्यात सहभागी असून काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटला असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वीही मथुरे याने नगरसेवकाचा कार्यक्रम करणार, बंदुकीतून गोळ्या मारण्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकला होता.

नगरसेवक शहाणे याच्या मोबाईलवर काल मध्यरात्री व्हिडीओ कॉल करून मथुरे याने कोयता आणि बंदूक दाखविली होती. त्यानंतर नगरसेवक शहाणे याने मोबाईल बंद केला तर काही वेळातच मथुरे याने शहाणे यांच्या घरी येवून दमदाटी केली. या सर्व प्रकारसंबंधी शहाणे यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीसांनी याप्रकरणी मथुरे यास अटक केली आहे.

याप्रकरणी पोलीस उपायुक्त विजय खरात तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी यांनी तपास चक्र फिरवून संशयितास अटक केली. त्यानंतर परिसरात त्याची दहशत कमी करण्यासाठी त्याला पोलिसी खाक्या दाखवीत परिसरातून फिरवण्यात सुद्धा आले .

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com