बाल्कनीतून पडल्याने दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

बाल्कनीतून पडल्याने दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

इमारतीच्या (Building) पहिल्या मजल्यावरून पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा (little girl) दुर्दैवी मृत्यू (death) झाल्याची घटना पवननगर (Pawan Nagar) येथे घडली. या घटनेमुळे परिसरात (area) सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे...

याबाबत सविस्तर वृत्त असे की,नवीन नाशकातील पवननगर येथे असलेल्या साईज्योत अपार्टमेंट (Saijyot Apartment) फ्लॅट नंबर ६ मध्ये पहिल्या मजल्यावर खैरनार कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील समृद्धी राहुल खैरनार (Samriddhi Rahul Khairnar) ही दीड वर्षांची चिमुकली बाल्कनीत खेळत असतांना अचानक तोल जाऊन खाली पडल्याने तिला गंभीर दुखापत झाली. कुटुंबियांनी तातडीने तिला पुढील उपचारासाठी गंगापूर रोडवरील (Gangapur Road) खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारावेळी तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार (constable) परदेशी करत आहेत.

फ्लॅटमध्ये राहत असलेल्या नागरिकांनी शक्य झाल्यास गॅलरीला ग्रिल बसवून घ्यावे. तसेच पालकांनी आपली लहान मुले गॅलरीत खेळत असल्यास त्यांच्यावर लक्ष द्यावे किंवा ते शक्य नसल्यास गॅलरीचा दरवाजा बंद ठेवावा जेणे करून अशी घटना पुन्हा घडणार नाही.

भगीरथ देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबड पोलीस ठाणे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com