
उमराणे | वार्ताहर | Umrane
मालेगाव तालुक्यातील (Malegaon Taluka) सौंदाणे (Soundane) येथे दीड वर्षीय बालिकेचा (Girl) पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोही समाधान पवार असे मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. काल सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मुंबई महामार्गावर ( Mumbai Highway) आडीवाट शिवारात राहणारे शेतकरी समाधान ताराचंद पवार हे नियमाप्रमाणे शेतात जनावरांना पाणी (Water) पाजत होते. तर त्यांची पत्नी घरात स्वयंपाक करत होती. त्याचवेळी मुलगी आरोही अंगणात खेळत होती.
त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी समाधान पवार हे घरात आले असता त्यांना आरोही कुठेही न दिसल्याने ते शोधू लागले. पंरतु, ती आढळून आली नाही. यानंतर पवार हे पाणी भरून ठेवण्यासाठी सिमेंटच्या टाकीजवळ गेले असता त्यांना आरोही पाण्यात पडलेली दिसली. यावेळी पवार यांनी लगेचच आरोहीला बाहेर काढले. मात्र, तिचा मृत्यू (Death) झाला होता.
दरम्यान, यावेळी मुलीचा मृतदेह पाहून आईने (Mother) हंबरडा फोडला होता. तर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर रात्री उशिरा आरोहीच्या मृतदेहावर (Dead Body) अंत्यसंस्कार करण्यात आले.