अवघ्या काही तासांत दीड वर्षांच्या अपहृत मुलीची सुटका

संशयिताच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
अवघ्या काही तासांत दीड वर्षांच्या अपहृत मुलीची सुटका

नवीन नाशिक | प्रतिनिधी ( New Nashik )

अंबड पोलीस ठाण्याच्या ( Ambad Police Station ) हद्दीत दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण (kidnapped) करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी सापळा रचत अटक करून अपहृत मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.

याबाबत सहाय्यक आयुक्त डॉ.सिद्धेश्वर धुमाळ यांनी माहिती दिली की, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनिताकुमारी जितेंद्र भारती (२५,धंदा मजुरी,रा. बिल्डिंग नंबर 6 पाचवा मजला घर नंबर 511 चुंचाळे शिवार, घरकुल, अंबड, नाशिक) ह्या कामावर गेल्या असताना त्यांची मुलगी सुमिया जितेंद्र भारती ( वय १ वर्षे ६ महिने ) हिचे (दि.२९ ) संध्याकाळी ६ वाजेपुर्वी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यावरून सदर अपहृत मुलीचा तपास करत असताना सपोनी गणेश शिंदे पोलीस शिपाई हेमंत आहेर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर मुलीचे अपहरण एका व्यक्तीने केले असल्याचे त्यांना समजले. यावरून वपोनी भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी गणेश शिंदे, उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस अंमलदार हेमंत आहेर, दिनेश नेहे, जितेंद्र वजिरे, सम्राट मते, सुवर्णा सहाने यांच्या पथकाने सापळा रचत संशयितांना अटक केली.

ज्या ठिकाणी सदर दीड वर्षाच्या मुलीला ठेवले होते तेथून पोलिसांनी तिची सुखरूप सुटका करून तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. सदर संशयिताने दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यामागे नेमके कारण काय व त्याचे इतर साथीदार आहेत का ? याचा आता पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी पुढील तपास वपोनी भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप पवार करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com