कला जोपसणारे दीड हजार व्हिडीओ

कला जोपसणारे दीड हजार व्हिडीओ

दिंडोरी । Dindori- नितीन गांगुर्डे

दिंडोरी (Dindori) शहरात चिकन विक्रीचा व्यवसाय (Business of selling chicken) करता करता 1500 व्हिडीओ बनवणारा अवलिया आता चांगल्या संधीच्या शोेधात आहे. चिकन विक्रीचा व्यवसाय करतांना अंगातील गुणांना वाव देऊन कला जोपासणार्‍या हमीद पठाणचे (Hamid Pathan) व्हीडीओ (Video) सध्या दिंडोरी शंहरात आणि जिल्हयात चर्चेचा विषय ठरले आहे.

कला ही कुणाच्या अंगात असु शकते. सर्वांनाच मोठ्या चित्रपटात (Movie) किंवा लघुपटात (short film) काम करण्याची संधी मिळेल असे नाही. कारण प्रत्येकाच्या पाऊलवाटा वेगळ्या असतात. प्रत्येकाचा शहरी भागात टच असतोच असे नाही. शहरी भागातल्या व्यक्तिला प्रसिदधी मिळुन जाते. परंतु ग्रामीण भागातील कलाकार (Artists from rural areas) प्रसिदधीपासुनही वंचित रहातोे. पण प्रसिदधीसाठी किंवा पैशासाठी काम करणारा व्यक्ति कलाकार (Artists) नसतो.

खर्‍या कलाकाराला पैशांची किंवा प्रसिदधीची गरज नसते. तो कलेला मिळणार्‍या वाहवाचा भुकेला असतो. त्याला कौतुकाचे दोन शब्द जरी ऐकायला मिळाले तरी त्याला त्याच्या कलेचे सार्थक झाल्याचे वाटते. अशाच कौतुकाचे दाने शब्द दिंडोरीकरांचे झेलत हमीदभाई पठाण इन्स्टाग्रामवर (Instagram) प्रसिद्ध झाले आहे.

सुरुवातीला हमीद भाई टिकटॉकचे (TickTock) व्हीडीओ बनवत. हमीदभाईचा चिकन विक्रीचा व्यवसाय आहे. पालखेड एमआयडीसीत (Palakhed MIDC) ते चिकन विक्री करतात. त्यांचा आणि व्हीडीओ बनवण्याचा काहीही संबध नव्हता. रोज येणे आणि मटन विक्री करुन कामगारांना खुश ठेवणे, आपली उपजिवीका भागवणे हेच त्याचे काम होते. परंतु नियतीने त्यांना कलेच्या क्षेत्रात अचानक ओढले.

मटन विक्री करतांना तेथे खरेदी करणारे मजुर टिकटॉकचे व्हीडीओ हमीदभाईंना दाखवत.ते व्हीडीओ पाहुून हमीदभाई चिडचिड करीत. परंप्रांतियांना ते रागावत. पण नंतर त्यांच्या मुलांच्या मोबाईलमध्ये त्यांनी टिकटॉकचे व्हीडीओ त्यांना दाखवले. सहज रिकामे पणात हमीदभाईंनी व्हीडीओ बनवला. तो टिकटॉकवर टाकला. त्याला खुप लाईक्स मिळाल्या. त्यानंतर हमीदभाईंची गाडी सुसाट सुटली. टिकटॉकवर त्यांनी 1000 व्हीडीओ बनवले. त्यांना दुबईतुनही लाईक्स मिळाल्या. त्यानंतर टिकटॉकने सुदधा त्यांना लाईव्ह ठेवुन त्यांचा सन्मान केला.

टिकटॉक बंद पडल्याने त्यांना रात्रभर झोप लागली नाही. व्यवसाय करता करता त्यांनी कला मरु दिली नाही.त्यांनी इन्स्टाग्रामवर व्हीडीओ टाकले. त्यांना तेथे प्रसिदधी मिळाली. आता त्यांची व्हीडीओ संख्या 1500च्या वर गेली आहे. व्हीडीओ बनवतांना त्यांची मुले त्यांना मदत करतात. घरात हमीदभाई प्रक्टिस करतात.ज्या पदधतीने चित्रपटाचा सीन तयार करतांना एक दोन तीन अ‍ॅक्शन म्हटले जाते,त्याप्रमाणे त्यांची मुले समिर, अरमान हे अ‍ॅक्शन म्हणतात, त्यानंतर हमीदभाई सिन सादर करतात.

अनेक चित्रपटांचे गाणे त्यांनी म्हटली आहे. दर्दभरे नगमे त्यांनी चित्रीत केले आहे.सुरुवातीला त्यांच्या पत्नी समिना यांना हे व्हिडीओ पाहुन राग यायचा. पण हमीदभाईनी कला असल्याचे स्पष्ट केले. हमीदभाईंच्या कलेची तारीफ त्यांच्या पत्नी समिना यांच्यापर्यत परस्पर पोहचली. त्यामुळे त्यांनाही हायसे वाटले. आजही हमीदभाई चिकन विक्री करता करता व्हिडीओ बनवतात.

हमीदभाई सध्या स्लो मोशन व्हीडीओंना पंसती देतात. त्यांची मुले त्यांना मदत करतात. दिंडोरी शहरातील अनेक डॉक्टर (Doctor), पोलिस अधिकारी (Police officer), पत्रकार (Journalist), शिक्षण क्षेत्रातील नामवंत त्यांच्या व्हीडीओंना लाईक्स करतात.त्यांचा चाहता वर्ग नाशिक (Nashik), मालेगाव (Malegaon), मुंंबई (Mumbai), दुबई (Dubai) आदी ठिकाणी आहे. अजुन मोठ्या संधीच्या शोधात हमीदभाई आहेत. पण चिकन विक्रीचा व्यवसाय करता करता इन्स्टाग्रामवर व्हीडीओ टाकणारा व कला जोपासणारा हमीदभाई हा अवलिया मुलखावेगळाच म्हणावा लागेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com