कोविड केअर सेंटरला दीड लाखांचे साहित्य भेट

हेम्पल पेन्टस कंपनीला १०५ वर्ष झाल्याचे औचित्य साधत भेट
कोविड केअर सेंटरला दीड लाखांचे साहित्य भेट

सिन्नर । प्रतिनिधी Nashik

येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड केअर सेंटरला माळेगाव औद्योगिक वसाहतीतील हेम्पल पेन्ट्स इंडिया प्रा.लि.कंपनीने पी.पी.ई. कीटसह दीड लाखाचे साहित्य भेट दिले.तालुक्यात करोनाचे रुग्ण वाढत असून त्यांच्यावर उपचार करतांना आरोग्य विभागाला अनेक साहित्याची कमतरता भासते आहे. आरोग्य विभागाच्या सेवक, अधिकार्‍यांच्या सुरक्षेची काळजी घेतली तर रुग्णांवर उपचार करतांना तेही कचरणार नाहीत. या भावनेतून कंपनीने पुढाकार घेतला.

कंपनीला १०५ वर्ष झाल्याचे औचित्य साधत ग्रामीण रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. निर्मला गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांच्याकडे ही मदत सुपूर्द करण्यात आली. त्यात पल्स, एन. मास्क, पीपीई किट, पीपीई किट वॉशेबल, ऑटोमेटेड हॅन्ड मशीनचा समावेश आहे. याप्रसंगी कंपनीचे प्लांट व्यवस्थापक विजय शेलार, हेल्थ सेफ्टी अँड विभागाचे संदीप वाघ, मानव संसाधन विभागाचे पार्थ चौहान, निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष सुधीर बडगुजर, तक्रार निवारण उपसमितीचे अध्यक्ष अतुल अग्रवाल, मंडळ अधिकारी संजय गाडे उपस्थित होते.

संपूर्ण जगात करोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनलॉक नंतर नाशिक जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.या महामारीच्या काळात केंद्र व राज्य सरकारकडून भरीव मदतीची मागणी होत असली तरी तेवढी पुरेशी ठरणार नाही.

सामाजिक उत्तरदायीत्व म्हणून आपलीही जबाबदारी आहे या भावनेतून ही मदत करण्यात येत असल्याचे शेलार म्हणाले.कोरोना भविष्यातही माळेगाव औद्योगिक वसाहतीतून अनेक उद्योगांकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन अग्रवाल यांनी दिले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com