मुंबई विद्यापीठाच्या बीए अभ्यासक्रमात नाशिकची ‘दगड आणि माती’ एकांकिका

मुंबई विद्यापीठाच्या बीए अभ्यासक्रमात नाशिकची ‘दगड आणि माती’ एकांकिका

नाशिक | प्रतिनिधी | Nasik

प्रायोगिक रंगभूमीवरचे प्रयोगशील नाटककार दत्ता पाटील (Datta Patil) यांनी लिहिलेल्या ‘दगड आणि माती’ या एकांकिकेची मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) बी.ए. मराठी (B.A. Marathi) अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे...

मराठी नाट्यक्षेत्रातील नाटककार, समीक्षक यासह अनेक दिग्गजांच्या कौतुकाला पात्र ठरलेल्या या एकांकिकेत इतिहास नसलेल्या गावाची अनोखी समकालिन गोष्ट त्यांनी मांडली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या बीए मराठीच्या दिव्तीय वर्षासाठी नाट्यसाहित्य (Drama Literature) विषयाकरिता एकूण नऊ एकांकिका आहेत. त्यात दिग्गज लेखकांच्या गाजलेल्या एकांकिका आहेत. यात लेखक दत्ता पाटील यांच्याही नव्या एकांकिकेचा समावेश झाल्याने समांतर रंगभूमीवरील नाट्यकर्मींनी आनंद व्यक्त केला आहे.

आपले लेखन हे अभ्यासाचा विषय होणे, ही बाब सुखावणारी तर असतेच, शिवाय जबाबदारीही वाढविणारी असते. ग्रामीण भागातील तरूण पिढीची विखंडीत मानसिकता, विभ्रमावस्था आणि जागतिक मंचावरून त्याच्यापर्यंत पोहोचणार्‍या वर्तमान स्थितीचा खरेखोटेपण, सांकेतिक सुप्त अजेंडे यांचा उकल न करता येऊ शकण्याचे असामर्थ्य यातून ग्रामीण भाग एकूणच व्यक्तिमत्वहीन होऊन गेला आहे. यापैकी अशाच एका गावातील युवकाची आणि गावाची ही गोष्ट आहे. जी युवकांना नक्कीच समकालाशी जोडून ठेवेल.

- दत्ता पाटील

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com