
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक (District Sports Officer Office Nashik), क्रीडा भारती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने व अनेक सहयोगी संस्थांच्या सहकार्याने
शनिवारी (दि.28) जागतिक सूर्यनमस्कार दिन (World Sun Salutation Day) व रथसप्तमीनिमित्त सामूहिक सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक हे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम (Chhatrapati Shivaji Maharaj Stadium) सीबीएस नाशिक येथे करण्यात आले.
या कार्यक्रमात नाशिक (nashik) येथील विविध शाळेतील (school) दोन हजार मुले मुली व शंभर शिक्षक (teachers) व पालक तसेच दोनशे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी यांनी आपला सहभाग नोंदवला. सर्वांनी मिळून सूर्यनमस्काराचे एक आवर्तन म्हणजेच 14 सूर्यनमस्कार पूर्ण केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, क्रीडा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत सदस्य साहेबराव पाटील,
जिल्हा अध्यक्ष विनोद शिरभाते, आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षिका शैलजा जैन, क्रीडा भारती उपाध्यक्ष स्नेहल देव, प्रीती त्रिवेदी तसेच जिल्हा क्रीडा कार्यालयातील महेश पाटील, भाऊसाहेब जाधव, संदीप ढाकणे व क्रीडा भारतीचे सुनील दवंगे, स्वप्नील कर्पे, पवन खोडे, अभिजीत देशमुख, युवराज शेलार, आशिष पाटील, निलेश दवंगे, अनिकेत देशमुख, सर्वेश पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
क्रीडा भारती अंतर्गत अखिल भारतीय स्तरावर घेतल्या जाणार्या क्रीडा ज्ञान परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नाशिक मधील दोन विद्यार्थ्यांचा प्रत्येकी 11 हजार रुपये धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक स्नेहल देव यांनी केले.विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार करण्यास योगा कल्चर असोसिएशन नाशिकचे सचिव पिराजी नरवाडे यांनी मार्गदर्शन केले.