मविप्र सत्यशोधक चळवळीच्या पायावर : मोगल

मविप्र सत्यशोधक चळवळीच्या पायावर : मोगल

कसबे सुकेणे । वार्ताहर | Kasbe Sukene

मविप्र संस्थेची (MVP Institute) उभारणी सत्यशोधक चळवळीच्या पायावर उभी असून ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे तत्व उराशी बाळगले. संस्थापकांनी रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यास विरोध केला.

तसेच, मविप्रच्या सभासदांना ओळखपत्रावरच संस्थेच्या मेडिकल कॉलेजमध्ये (Medical College) मोफत उपचार केले जातील, असे प्रतिपादन मविप्र संस्थेचे उपसभापती डी.बी. मोगल (Deputy Chairman of MVP organization D.B. mogul) यांनी केले आहे. सत्यशोधक चळवळीला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मौजे सुकेणे (mauje sukene) येथील कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल (Karmaveer Raosaheb Thorat High School) व ज्यु. कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात मोगल बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बाळासाहेब शिंदे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कवी प्रा.ज्ञानोबा ढगे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रामकृष्ण बोंबले, स्कूल कमिटीचे सदस्य दिलीप मोगल, प्रा.धनंजय देशमुख, मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे, उपमुख्याध्यापक शिवाजी कोटकर, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे, ज्यु. कॉलेज विभाग प्रमुख प्रा.राजेंद्र धनवटे उपस्थित होते.

प्रारंभी संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर गणपत दादा मोरे (Karmaveer Ganpat Dada More), राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj), महात्मा फुले (mahatma phule), डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना डी.बी. मोगल म्हणाले की, संस्थेच्या शिक्षण महर्षींनी सत्यशोधक समाजाच्या चळवळीवरच संस्थेची उभारणी करून ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे तत्व उराशी बाळगले.

संस्थापकांनी रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यास विरोध केला. संस्थेविषयी बोलताना त्यांनी मविप्र संस्थेच्या सभासदांना केवळ ओळखपत्रावरच संस्थेच्या मेडिकल कॉलेजमध्ये सर्व प्रकारचे उपचार मोफत व तत्काळ दिले जातात. शिक्षकांनी आपापले काम प्रामाणिकपणे करावे अशी ही अपेक्षा मोगल यांनी व्यक्त केली. प्रमुख वक्ते प्रा.कवी ज्ञानोबा ढगे यांनी सत्यशोधक समाज चळवळीची पायाभरणी ज्या सुधारकांनी केली त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.

अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. अतिथींची ओळख कवी मुकुंद ताकाटे यांनी तर सूत्रसंचालन भारत मोगल यांनी तर रामेश्वर धोंगडे यांनी आभार मानले. याप्रसंगी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com