ना नफा, ना तोटा गणेश मूर्ती विक्री केंद्राचा शुभारंभ

राष्ट्रवादी युवक काँग्रेस व मदत फाउंडेशनचा उपक्रम
ना नफा, ना तोटा गणेश मूर्ती विक्री केंद्राचा शुभारंभ

नाशिक | प्रतिनिधी

गणेशोत्सवानिमित्त नागरिकांसाठी ना नफा, ना तोटा या तत्त्वावर गणेश मूर्ती विक्री केंद्राचा शुभारंभ त्रिमूर्ती नगर, हिरावाडी रोड येथे परिसरातील ज्येष्ठ नागरिक व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस व मदत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो.

सणासुदीच्या काळात नागरिकांची आर्थिक बचत व्हावी या दृष्टीने राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी युवक काँग्रेस व मदत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “ना नफा, ना तोटा” गणेश मूर्ती विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षापासून युवक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या वतीने परिसरात अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. पारंपारिक सण साजरे करत असतांना बचत व्हावी. या उद्देशाने हा उपक्रम राबविला जातो. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन अंबादास खैरे यांनी केले.

यावेळी अरविंद खैरनार, दिनकर लोहकरे, भास्कर सोनवणे, शंकर मोकळ, मनोहर आव्हाड, मोहन तांबे, प्रविण कोरडे, गिरीश पुरिया, संदीप गांगुर्डे, भालचंद्र भुजबळ, गणेश बोडके, संदीप खैरे, सागर तांबे, राम शिंदे, राज रंधवा, अमोल सोनवणे, रोहित जाधव, सुशील सोळंकी, अमर गोसावी, शुभम पाटील, प्रकाश आव्हाड, विनायक जाधव, सागर पुरकर, कौस्तुभ जथे, गणेश बाविस्कर आदींसह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com