
नाशिक | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरेला अभिनय आणि गायनाच्या माध्यमातून भारतीय संगीत रंगभूमीला सुवर्णयुगात नेणारे संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या १०२ व्या स्मृती समारोह निमित्त संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेच्या वतीने नाशिक येथे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन बुधवार दि. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता करण्यात आले असल्याची माहिती परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा आयोजक दिलीप साळुंखे यांनी दिली.
गंगापूर रोडवरील राजुर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेजच्या सभागृहात या परिषद मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली होत असून दुपारी 2 वाजता उद्घाटन मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
तीन सत्रात विभागलेल्या या परिषदेत प्रसिद्ध नाटककार दत्ता पाटील, प्रसिद्ध सिने नाट्य दिग्दर्शक सचिन शिंदे आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक भोजराज चौधरी यांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय वाटचाली संदर्भात मुक्त चर्चेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी संगीत नाटकातील गितांचे सादरीकरण होणार आहे.
समारोप सत्रात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील आणि सार्वजनिक बांधकाम नाशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, प्राचार्य प्रशांत पाटील, उद्योजक साहेबराव साळुंकेपाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय अशी कामगिरी करणाऱ्या आणि केशवराव भोसले यांचे वंशज असलेल्या परिवारातील सदस्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.
उपस्थित रहावे असे आवाहन मनोज आमले, माधव मुधाळे, उल्हास बोरसे, संदीप सोमवंशी, उमेश शिंदे, सुनील घुले, अमित पवार, सागर पाटील, मंगेश टर्ले, अरविंद देशमुख, बाळासाहेब आमरे, महेंद्र बच्छाव, डॉ. संदीप बोरसे, शिल्पा देशमुख, कल्पना रेवगडे, अश्विनी भाकरे, विनायक चव्हाण, अमोल पाटील, चेतन देवरे, आदित्य कडलग, सुनिल कोईंकर, विक्रम कदम, क्रांती बेडसे, कुणाल देसले आदिंनी केले आहे.
यावेळी संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सतीश पावडे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील, विभागीय अध्यक्ष दिपक भदाणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र निंबाळते, जिजाऊ ब्रिगेडच्या माधुरी भदाणे, उद्योजक कक्षाचे विशाल देसले. आदि उपस्थित राहणार आहेत.