सप्तशृंगी गड :  दसर्‍याला 'इतक्या' भाविकांनी  घेतला महाप्रसादाचा लाभ

सप्तशृंगी गड :  दसर्‍याला 'इतक्या' भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

कळवण | प्रतिनिधी | Kalwan

आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगी गड (Saptashrungi Gad) येथे नवरात्रोत्सवाच्या (Navaratrotsav) विजयादशमी (Vijayadashami) निमित्त श्री सप्तशृंगी देवीची महापूजा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र  न्यायाधीश वर्धन पी देसाई यांनी सपत्नीक केली. या दिवशी ट्रस्टच्या प्रसादालयात सुमारे 5 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला....

सकाळी सप्तशृंगी देवीला नवीन सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. गडावरील पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी 7 वाजता देवीची महापूजा करण्यात आली.

याप्रसंगी आमदार राम शिंदे, विश्वस्त संस्थेचे विश्वस्त बंडू कापसे, विश्वस्त अ‍ॅड. ललित निकम, मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा विभाग प्रमुख यशवंत देशमुख आदी उपस्थित होते.

सालाबादप्रमाणे अश्‍विन नवमीस सप्तशृंगगडावर नवमीच्या दिवशी शतचंडी याग व होमहवन विधी सुरू करून त्याची पूर्णाहुती दशमीच्या दिवशी बोकड बळीच्या विधीनंतर पुरोहितांच्या मंत्रघोषात बळीची आहुती देवून दसर्‍याचा अदभुत सोहळा पार पडला.

बोकड बळीच्या विधीवत पुजेसाठी सरपंच नांदुरी, सप्तशृंगगड, विश्वस्त संस्था  व परंपरेचे मानकरी यांनी महसूल व पोलीस प्रशासनाच्या प्राप्त सूचनेनुसार पूर्तता केली. स्थानिक ग्रामस्थ व भाविकांनी सदर प्रक्रिया राबविताना विशेष सहकार्य देवू केले.

पूर्णाहुती प्रसंगी संस्थानाचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई, ध्वजाचे मानकरी गवळी परिवार सदस्य, बोकड बळी मानकरी, विश्वस्त बंडू कापसे, विश्वस्त् अ‍ॅड. ललित निकम, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे, पोलीस निरीक्षक समाधान नागरे,   सरपंच रमेश पवार आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रासह विविध राज्यातील आलेल्या तब्बल 25 हजार भाविकांच्या उपस्थितीत मंदिर गजबजून गेले होते. यावेळी संपूर्ण गडावर भाविक ‘सप्तशृंगी माता की जय, बोल अंबे माते की जय’ चा मोठ्या आवाजात जयघोष करत होते. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रसादालयात सुमारे 5 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

सप्तशृंगगड येथील स्थानिक रहिवाशांना आज दसरा निमित्ताने विशेष दर्शन उपलब्ध करून देण्यात आले. भाविकांना सुरक्षित दर्शन घेण्यासाठी ट्रस्टच्या मार्फत व्यवस्था करण्यात आली. नवरात्र उत्सवासाठी पुरोहित वर्ग, सर्व ट्रस्ट कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, यांसह जिल्हा पोलीस व महसूल प्रशासन विभाग आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com