‘माझी वसुंधरा अभियान’मध्ये रांगोळी स्पर्धा

पिंपळगाव ग्रामपालिकेच्या वतीने आयोजन
‘माझी वसुंधरा अभियान’मध्ये रांगोळी स्पर्धा

पिंपळगाव ब. । वार्ताहर Pimpalgaon Baswant

येथील मविप्र संस्थेच्या (MVP) कर्मवीर काकासाहेब वाघ (Karmaveer Kakasaheb Wagh) कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) ग्रामपालिकेच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यात आले. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत रांगोळी (Rangoli), निबंध (Essay) आणि वक्तृत्व स्पर्धा (Eloquence competition) घेण्यात आल्या. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माझी वसुंधरा विषयक शपथ देण्यात आली. विद्यार्थीनींनी काढलेल्या रांगोळीचे उद्घाटन सरपंच अलका बनकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच निलेश कडाळे, सदस्य गणेश बनकर, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष विश्वास मोरे,

व्यवसायिक अभ्यासक्रम (Vocational course) स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष उल्हास मोरे, प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, उपप्राचार्य प्रा.ज्ञानोबा ढगे, ज्युनियर कॉलेज प्रमुख प्रा.एन.के. सोनवणे, श्रीमती. सत्यभामा बनकर, दीपक विधाते, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम, अश्विनी गागरेपाटील, राहूल बनकर, प्रा.अल्ताफ देशमुख यांचेसह महाविद्यालयातील 115 विद्यार्थ्यांनी माझी वसुंधरा अभियानावर रांगोळी काढली.

तर निबंध स्पर्धेत 75 विद्यार्थ्यांनी मराठी (marathi), हिंदी (hindi) आणि इंग्रजी (english) भाषेत निबंध लिहून सहभाग नोंदविला. महाविद्यालयाने विकसित केलेल्या रोपवाटिकेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलतांना गणेश बनकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी (students) आपला परिसर प्रदूषणमुक्त (Pollution free) करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तसेच समाजात याविषयी जनजागृती करावी असे आवाहन केले.

यावेळी ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम (Village Development Officer Lingaraj Jangam) यांनी या अभियानाचा उदेश सांगितला. उपप्राचार्य ढगे यांनी महाविद्यालयातील उपक्रमांची माहिती दिली. प्रा.अल्ताफ देशमुख यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.एन.के. सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.चित्ररेखा जोंधळे, प्रा.डॉ.छाया भोज, प्रा.उज्ज्वला डेरे, प्रा.नारायण पाटील,

प्रा.ए.एस. मोरे, प्रा.डॉ.ज्ञानेश्वर सातभाई, प्रा.डॉ.उपेंद्र पठाडे, प्रा.जयश्री गोवर्धने, प्रा.छाया डुकरे, प्रा.डॉ. सोनाली पाटील, प्रा. सारिका वर्पे, प्रा.एस.के. खैरनार, प्रा. सचिन जाधव, प्रा.नारायण शिंदे, प्रा.भगवान कडलग, प्रा.अनिल गवळी, प्रा.सारिका गायकवाड, प्रा.सम्राज्ञी मोरे, प्रा.प्रणाली जाधव, प्रा.शांताराम वळवी, प्रा.राकेश देशमुख, सौरभ महाले, चेतन बिडवे, आर.आर. बोरस्ते, सागर शिंदे, रुपेश पवार आदींनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com