मविप्र समाज सेवक सहकारी सोसायटी लि. ची दीर्घ कर्ज मर्यादा 'इतक्या' लाखापर्यंत

न्यूज अपडेट/News Update
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज सेवक सहकारी सोसायटी लि. नाशिक यांच्यावतीने ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने सभासदांना दीर्घ कर्ज मर्यादा २५ लाखापर्यंत करण्यात आली आहे, तर आकस्मित कर्ज मर्यादा ७५ हजार ठेवण्यात आली.

संस्थेची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा प्रा. अनिल भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सोसायटीचे उपाध्यक्ष मनीष बोरसे व मानद चिटणीस मंगेश ठाकरे उपस्थित होते. सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पारपडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

सोसायटीस या आर्थिक वर्षात ४ कोटी १२ लाख ३१ हजार ९२९ रुपये इतका नफा झालेला असून ६.२५% दराने लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक सभासदाची २५ लाख रुपयेची अपघात विमा पॉलिसी घेण्यात आलेली आहे पुढील आर्थिक वर्षात इन्शुरन्स पॉलिसी ऐवजी प्रत्येकी आठशे रुपये निधी जमा करून मयत सभासद वारसांना रुपये दोन लाखाची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सर्वात महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय म्हणजे सभासदाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कर्जमाफी योजने अंतर्गत कर्जदार सभासदाचे २५ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. बिगर कर्जदार मयत सभासदांच्या वारसास रुपये १ लाख आर्थिक मदत केली जाईल. तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांना प्रत्येकी ११,०००/- रुपये मानधन देण्यात येणार आहे. विद्यार्थी बक्षीस योजनेत प्रत्येक गटात दोनशे रुपयांनी वाढ करण्यात आली. सोसायटीचे अद्यावत करण्यात आलेले असून वैयक्तिक खात्याचे स्टेटमेंट डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यावेळी सोसायटीचे संचालक नंदकुमार घोटेकर, सुनील आहेर, विनीत पवार, सुनील काळे, ज्ञानेश्वर जाधव, प्रा. डॉ. संजय शिंदे, बाबा मोरे, शांताराम चांदोरे, दत्तराज ह्याळीज, बळीराम जाधव, संजय नागरे, किरण उघडे, प्रा. वैशाली कोकाटे, सुवर्णा कोकाटे, दत्तू पडोळ आदी सह सेवक वर्ग रावसाहेब क्षीरसागर, सुजित देशमुख, शिवाजी जामदार, कविता लिलके, आशा अहिरे आदी उपस्थित होते.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com