कडक लॉकडाऊन काळात क्रिकेट खेळणे भोवले; गंगापूर गावात सात जणांवर गुन्हा

कडक लॉकडाऊन काळात क्रिकेट खेळणे भोवले;
गंगापूर गावात सात जणांवर गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी

जिल्हा तसेच राज्यभरात कोवीड रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन सुरू असताना गंगापूर गाव येथे रविवारी (दि.16) क्रिकेट खेळणार्‍या तसेच हाणामार्‍या करणारांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, सह साथरोग प्रतिबंधक काद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत....

राम सुनिल पवार (26) , सोनु संजय कटारे (25), अक्षय संजय कटारे (22), निखील भगवान जाधव (29), अभिजीत भवर (20), हरिश भवर (19), सुरज शिंदे (20, रा. सर्व राजवाडा, गंगापूर गाव) अशी गुन्हे दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

या प्रकरणी शुभम रंगनाथ मधे (रा. गोवर्धन) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संशयित सर्व क्रिेकेट खेळत असताना अचानक संशयित कटारे याने बॅट हिसकावून मधे यास मारहाण केली.

मधे व त्याचा भाऊ तसेच मित्र सोडवण्यासाठी आले असता त्यांना मारहाण केली. सर्वजन बचावासाठी पळत असताना संशयितांनी गावातून आरडाओरड करत त्यांचा पाठलाग केला.

तसेच दगड विटा फेकून मारल्याने 3 जण जखमी झाले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक शेंडकर करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com