
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
वृद्धेच्या घरात घुसून तिला चाकूचा धाक दाखवत एकाने तिच्या हातातील साेन्याच्या अंगठ्या ओरबाडल्या आहे. ही घटना शरणपूरराेड (Sharanpur Road) लगत असलेल्या हाेलाराम काॅलनीत (Halaram Colony) आज सायंकाळच्या सुमारास घडली...
याबाबत सरकारवाडा पाेलिसांनी (Sarkarwada Police) घटनास्थळी दाखल होत माहिती घेतली. पोलिसांनी संशयिताचा शाेध सुरु केला आहे. पद्मा केला (रा. संचेती टाॅवर, हाेलाराम काॅलनी) असे लूट झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.
वृद्ध महिला मंगळवारी (दि. १४) घरात एकट्याच असताना एक संशयित बळजबरीने त्यांच्या घरात शिरला आणि त्याने पद्मा यांना चाकूचा धाक दाखवत दमदाटी केली. यावेळी पद्मा यांच्या हाताच्या बाेटातील साेन्याच्या दाेन जुन्या अंगठ्या काढून चोरट्याने पळ काढला.
त्यानंतर पद्मा यांनी ही घटना तत्काळ नातलगांना कळवली. घटनेची माहिती कळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन साेनवणे, उपनिरीक्षक काेल्हे आदी घटनास्थळी पोहोचले. पुढील तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत.