वृद्ध महिलेची विहिरीत उडी घेत आत्महत्या

वृद्ध महिलेची विहिरीत उडी घेत आत्महत्या

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

घरात किरकोळ भांडण (quarrel) झाल्याने संतप्त झालेल्या एका वृद्ध महिलेला भांडणाचा राग आल्याने रागाच्या भरात घराबाहेर पडत जवळच असलेल्या विहिरीत (well) उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी (Nashik Road Police) आकस्मात मृत्यूची (Death) नोंद केली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकरोड येथून जवळच असलेल्या पळसे (Palase) कारखाना रोडवरील गायके मळा परिसरात (Gaike Mala Area) ही घटना घडली असून अंजनाबाई शिवाजी गायके (Anjanabai Shivaji Gaike)) असे आत्महत्या केलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे.

अंजनाबाई गायके यांचे घरातील कुटुंबीयांसमवेत किरकोळ भांडण झाले होते. या भांडणाचा राग त्यांना अनावर झाल्याने त्यांनी रागाच्या भरात घराच्या जवळ असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी आजूबाजूला शोध घेतला.

याचवेळी त्यांना अंजनाबाई यांची चप्पल विहिरीच्या कडेला आढळून आली. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस पाटलांशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने विहिरीत गळ टाकून शोध घेतला असता अंजनाबाई गायके यांचा मृतदेह (Body) गळाला अडकून आला.

दरम्यान, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) विशाल विलास गायके यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे (PI Anil Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पवार करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com