येवल्यातील शिवसैनिकांसोबत भुजबळांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

येवल्यातील शिवसैनिकांसोबत भुजबळांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

येवला | Yeola

शिवसेनेचे तत्कालीन नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते ५ मार्च १९८३ साली येवला शहरात पहिली शिवसेनेची (Shivsena) शाखा सुरू केली होती. या स्थापनेला आज चाळीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येवला शहरातील शिवसेनेचे नेते किशोर सोनवणे यांच्यासह जुन्या शिवसैनिकांनी येवला संपर्क कार्यालयात छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत छगन भुजबळ यांनी शिवसैनिकांना जय महाराष्ट्र केला...

येवल्यातील जुने शिवसैनिक किशोर सोनवणे यांच्यासह शिवसैनिकांनी आज छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जुन्या छायाचित्रांचा अल्बम छगन भुजबळ यांना दाखविला.

येवल्यातील शिवसैनिकांसोबत भुजबळांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
Video : कांदाप्रश्नी केंद्रीय मंत्र्यांना शेतकऱ्यांचा घेराव; डॉ. भारती पवार म्हणाल्या...

यावेळी जुने फोटो बघताच छगन भुजबळ यांनी येवल्यातील सभा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, दादा कोंडके तसेच इतर नेत्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी उपस्थित शिवसैनिकांसोबत जुन्या आठवणींच्या गप्पांमध्ये छगन भुजबळ व कार्यकर्ते रममान झाल्याचे बघावयास मिळाले. येवल्यातील शिवसेना शाखा स्थापनेबाबत जुन्या कार्यकर्त्यांची छगन भुजबळ यांनी चौकशी केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

येवल्यातील शिवसैनिकांसोबत भुजबळांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
विमानात पुन्हा किळसवाणा प्रकार! मद्यधुंद अवस्थेत सहप्रवाशावर केली लघुशंका

यावेळी शिवसैनिक बाजीराव भोर, चंद्रमोहन मोरे, गणेश सोनवणे, अर्जुन मोडसे, भागीनाथ थोरात यांनी भेट घेत छगन भुजबळ यांचा सन्मान केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com