लसीकरणाला आलेल्या वृद्धाने कर्मचार्‍याच्या हाताचे बोटच मोडले

वृद्धाचा सिव्हील केंद्रावर तमाशा
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

नाशिक । Nashik

करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी जिल्हा शासकीय रुलयातील कोव्हिड लसीकरण केंद्रावर एका ज्येष्ठ नागरिकाने गोंधळ घातला. त्यांनी केलेल्या धक्काबुक्की तेथील कर्मचार्‍याच्या हाताच्या बोटाचे हाड मोडल्याचा प्रकार मंगळवारी (दि.9) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडला.

अशोककुमार कुंदणलाल भाटीया व एक महिला तसेच युवकाविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अतिश छगन भोईर (40) यांनी तक्रार दाखल केली आहे.

अतिश यांच्या फिर्यादीनुसार लसीकरण केंद्रावर ते काम करत असताना सायंकाळी साडे चारच्या सुमारास संशयित भाटीया एक महिला व 30 ते 35 वयोगटातील तरुणासह केंद्रावर आले. त्यांनी लस घेण्यासाठी आलो असल्याचे सांगत आरोग्य सेतु पवरील मेसेज दाखवला.

मात्र अतिश यांनी आजचे दिवसभरातील लसीकरणाचे काम पुर्ण झाले आहे, त्यामुळे तुम्ही उद्या या असे सांगितले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकाने शिवीगाळ करीत आताच लसीकरण करा असा आग्रह केला. वरिष्ठांनी परवानगी दिल्यास आम्ही लस देऊ असे अतिश यांनी सांगितल्यानंतर ज्येष्ठ नागरिकासोबत असलेल्या युवकाने मोबाईलमध्ये व्डिीओ काढण्यास सुरुवात केली.

त्यास विरोध केला असता ज्येष्ठ नागरिकाने अतिश यांचा हात पिरगळला तसेच अरेरावी करीत गोंधळ घातला. दरम्यान, वैद्यकीय चाचणी केली असता बोटाचे हाड मोडल्याचे समजले.

दरम्यान, अतिश यांनी भाटीया विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com