<p>नाशिकरोड । Nashik </p><p>नाशिकरोड परिसरातील शिंदे येथे दोन गटांच्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भास्कर शिवराम साळवे (वय ६०) रा. शिंदेगाव, नायगाव रोड नाशिक) असे वृद्धांचे नाव आहे. शेतीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी होऊन एकाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे</p> .<p>पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भास्कर साळवे यांच्या घरसमोर गावातील देविदास साळवे, आझाद पाटील, प्रफुल्ल पाटील आणि इतरांनी लाथाबुक्क्यांनी साळवे यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या छातीला, पोटाला जबर दुखापत झाली. त्यांना जिल्हा रुग्णलयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे यांनी त्यांना मृत घोषित केले.</p><p>नाशिकरोड पोलिसांनी मयत भास्कर साळवे यांच्या पाच नातेवाईका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. </p>