शिरवाडे वाकद । Shirwade

कानळद ता.निफाड येथील गावठाण परिसरात विद्युत तार अंगावर पडून यशोदाबाई देवचंद जाधव (वय ६५) यांचा शॉक लागून जागेवर मृत्यू झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कानळद गावठाण परिसरात आज दुपारी १ विजेच्या दरम्यान यशोदाबाई जाधव या वृद्द महिला आपल्या घराजवळ बाभळीच्या काट्या तोडत असतांना गावठाणातील विद्युत खांबांवरील तार त्यांच्या मानेवर पडली. त्यामुळे मानेला जबर इजा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती कळताच लासलगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी हजर होऊन त्यांनी पंचनामा केला.त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

त्यांच्या मृत्यूची लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे. अधिक तपास स.पो.नी.राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.उपनिरीक्षक रमेश जोपळे, पो.कॉ.ठोंबरे करीत आहेत.