वयोवृद्ध दाम्पत्याचा स्कोर १६, ऑक्सिजन पातळी कमी, तरीही घरीच केली करोनावर यशस्वी मात...

वाचा गोंदेगाव येथील करोनाबाधित वयोवृद्ध दाम्पत्याची यशोगाथा
वयोवृद्ध दाम्पत्याचा स्कोर १६, ऑक्सिजन पातळी कमी, तरीही घरीच केली करोनावर यशस्वी मात...

भरवसफाटा | विकास भोसले

निफाड तालुक्यातील गोंदेगाव तीन हजार लोकसंख्येच्या गावात करोनाने थैमान घातले असुन बरेच रूग्ण बाधित आढळून आले आहेत. एकीकडे बाधित रुग्णांची संख्या वाढलेली असताना दुसरीकडे गावातीलच वयोवृद्ध दाम्पत्याने करोनावर यशस्वी मात करत दिलासा दिला आहे. सध्या या दाम्पत्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

चांगदेवराव शिंदे वय 72 व त्यांच्या पत्नी गयाबाई शिंदे वय 66 असे या दाम्पत्याचे नाव आहे. 10 एप्रिलला 2021 रोजी अशक्तपणा, खोकला जाणू लागल्यामुळे त्यांचा मुलगा शिवाजी शिंदे यांनी प्रथम उपचार म्हणून गावातच डॉक्टर गोरख शिरापुरे यांच्याकडे तपासणी केली होती.

सलाईन व गोळ्या घेतल्या त्यानंतरही शिंदे यांना काही फरक जाणवला नाही. अखेर दुसऱ्या दिवशी लासलगाव येथील डॉक्टर चांडक यांच्याकडे उपचारासाठी केले असता, डॉक्टर चांडक यांनी कोविड टेस्ट करण्यासाठी सांगितले.

यानंतर शिंदे दाम्पत्यांना येवला येथे डॉक्टर गायकवाड यांच्याकडे तपासणी केली असता, त्यांची पंधरा तारखेला कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली.

16 तारखेला एच आर सिटी केली असता यांचा चांगदेवराव शिंदे यांचा स्कोर 14 व गयाबाई शिंदे यांचा स्कोर 16 एवढा स्कोर असताना शिंदे कुटुंबीय घाबरले नाहीत. त्यांनी येवला येथेच ऍडमिट करण्यासाठी हॉस्पिटलचे शोधाशोध केली.

मात्र, स्कोर जास्त असल्याने त्यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला नाही. त्यांनी पुन्हा तपासणी केली असता त्यांना ऑक्सीजन बेडची गरज असल्याचे डाॅ. चांडक यांनी सांगितले.

त्यानंतर त्यांनी लासलगाव, विंचूर, निफाड, पिंपळगाव, नाशिक येथील सर्व हॉस्पिटलला चौकशी केली. मात्र, त्यांना कुठेही बेड मिळाला नाही. कोणत्या हॉस्पिटल मध्ये त्यांना ऍडमिट करून घेतले गेले नाही.

यानंतर शिंदे कुटुंबीयांनी घरीच उपचार घेण्याचे ठरवले. येवला येथील डॉक्टर गायकवाड यांनी दिलेल्या गोळ्या औषध घेऊन तसेच दररोज सकाळ संध्याकाळ काढा सकाळी गरम पाणी, वाफ व सकाळी नाष्टा दोन अंडी, कोरा चहा, अकरा वाजता पोटभर जेवण त्यानंतर झोप दुपारी तीनला फळे, थोडेफार शेतीची कामे, पाच वाजता चहा, दोन अंडी, संध्याकाळी सहा वाजता पुन्हा काढा व 8 .30 जेवण असा दिनक्रम त्यांनी ठेवला.

यातून शिंदे कुटुंबीय पूर्ण पूर्णपणे बरे झाले आहे. शिवाय त्यांचे लाखो रुपयेदेखील वाचले आहेत. आज पूर्वीप्रमाणेच ते शेतीची कामे करत आहेत. त्यांना कोणतीही इंजेक्शनची गरज भासली नाही. करोनातुन ते पुर्ण पणे बरे झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यासह गोंदेगावमध्ये करोनाने थैमान घातले असुन बरेच करोना पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. त्यांनीही घाबरू नका सकारात्मक विचार ठेवा. मला साधा आजार आहे, लवकर यातून बरा होईल असे विचार करत रहा. आहाराकडे लक्ष द्या. आराम करा, मनोधैर्य खचु देऊ नका. बेडसाथ शोधाशोध करणारे आम्ही दोघेही ठणठणीत आहोत.

चांगदेवराव शिंदे, करोनामुक्त वृद्ध भरवसफाटा

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com