
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील भद्रकाली जवळ असलेल्या टॅक्सी स्टँड जवळ असलेला जुना वाडा कोसळून एकाचा मृत्यु तर अन्य चौघे जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. ही घटना पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान सततच्या पावसामुळे येथील वाडा कोसळून भाडेकरू म्हणून राहणाऱ्या राजेंद्र बोरसे या युवकाचा अंगावर भिंत कोसळून जागीच मृत्यू झाला. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दलाने अर्धा तास रेस्क्यू ऑपरेशन करीत सर्वाना बाहेर काढले. या घटनेनंतर जुन्या वाड्याच्या पप्रश्न ऐरणीवर आला आहे.