ओझर । Ozar

ओझर ग्रामपलिकेचे नगरपरिषदेत रूपांतर होणार अशी उद्घोषणा चार डिसेंबर रोजी शासनाने केल्याने पुढील प्रक्रियेला लागणारा वेळ लक्षात घेता तूर्तास ग्रामपलिकेची निवडणूक प्रक्रिया राबवावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे. नगरविकास विभागाने नगरपरिषद अंमलात येणार असल्याचे न्यायालयासमोर स्पष्ट केल्याने तो देखील मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील 13 ग्रामपालिकेचे नगर पंचायत अथवा परिषद मध्ये रूपांतरित करण्याचे शासनाने जाहीर केले होते. परंतु निवडणूक आयोगाने यावर्षीच्या एप्रिल ते डिसेंबर या कालावधीतील 14234 ग्रामपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.

त्यामुळे ओझरसह राज्याततील इतर गावातील नागरिकांमधे मोठा संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे रूपांतरित ग्रामपालीकेच्या निवडणुका न घेता थेट त्या नगरपरिषदांच्या घ्याव्या अशी याचिका माजी आमदार अनिल कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.

त्यावर मंगळवारी दुपारी बारा वाजता सुनावणी सुरू झाली. कोर्टाने नगरविकास विभागाचे म्हणणे अडीच वाजेच्या सुमारास मागवले. त्यात तेरापैकी ओझरची प्रक्रिया आधीच झाल्याने त्या प्रक्रियेला किमान दोन महिने लागतील तर इतर 12 गावांच्या प्रक्रियेला चार महिने लागतील असे सांगण्यात आले.

परंतु आधीच कार्यकाळ संपल्याने आणि निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असल्याने त्यांचे म्हणणे न्यायलयाने ऐकून घेतल्यावर शेवटी मुदत संपल्यामुळे तूर्तास जाहीर झालेल्या निवडणूका घ्याव्यात व ज्यावेळी नगरपरिषद परिषद म्हणून अंतिम प्रक्रिया राबवली जाईल.

तेव्हा तो देखील निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले. त्यामुळे तूर्तास ग्रामपालिकेची निवडणूक होईल परंतु जेव्हा त्याचे रूपांतर नगरपरिषदेत होईल तो कार्यक्रम तेव्हा जाहीर होईल असे स्पष्ट झाले आहे.

राज्य शासनाने नगरपरिषदेचे राजपत्र काढलेले असल्याने ती प्रक्रिया असे तशी सुरूच राहणार आहे. सध्या ग्रामपालिकेची निवडणूक होत असली तरी नगरपरिषद अंमलात येणारच आहे. सदर निवडणुकीवर होणारा दुप्पट खर्च पाहता ती दोन महिने पुढे ढकलण्यात यावी म्हणून याचिका दाखल केली होती. परंतु आता दोन्ही निवडणूका होतील इतकेच यात कुणीही गैरसमज पसरवू नये.

- अनिल कदम, माजी आमदार निफाड