आश्रमशाळांची शिक्षणयात्रा : ऑफलाईन शिक्षणात शिक्षक झाले 'मित्र'

करोना काळात शिक्षकमित्रांचे अनोखे ज्ञानदान
आश्रमशाळांची शिक्षणयात्रा : ऑफलाईन शिक्षणात शिक्षक झाले 'मित्र'

नाशिक । गोकुळ पवार

गेल्या दीड वर्षभरापासून राज्यासह जिल्ह्यात शाळा बंद शिक्षण सुरु (Shala Band Shikshan Suru) या धर्तीवर ऑनलाईन शिक्षण (Online Education) सुरु आहे. परंतु ग्रामीण भागात इंटरनेट (Internet), मोबाईल ची सुविधा नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहावे लागले. अशातच अनेक शाळा (schools), संस्थांच्या माध्यमातून शिक्षक मित्रांनी ऑफलाईन अध्यापन (Offline Teaching) करीत शिक्षण गंगा निरंतर ठेवली.

करोनामुळे (corona Crisis) सर्वत्र शाळा बंद आहे. मात्र ऑनलाईन शिक्षण (online education) जेथे सुविधा आहे तेथे सुरु आहे. मात्र ज्या भागात मोबाईल नेटवर्कच (Mobile Network) नाही तेथील विद्यार्थ्यांचे काय? या विद्यार्थाचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय आश्रम शाळांच्या (Goverment Ashram schools) माध्यमातून शिक्षक मित्र उपक्रम (Shikshak Mitr Campaign) राबविण्यात येत आहे. ज्या ठिकाणी इंटरनेट ची सुविधा नाही, मोबाईल नाही, नेटवर्क नाही अशा गावांची यादी (Villeage List) करण्यात आली. त्यांनतर एका शिक्षकास दोन गावे अशी तालुक्यातील गावांची विभागणी करण्यात आली. या शिक्षकांनी आठवड्यातून दोनदा गावात जाऊन शिकवण्यास सुरुवात करावी अशा सूचना शाळा व्यवस्थापनाकडून आल्या.

दरम्यान या शिक्षकांना आठवडाभर येणे शक्य नसल्याने त्यांनी गावातीलच काही होतकरू, शिकवण्याची आवड असणाऱ्या, शिक्षित तरुण तरुणींना संधी द्यायचं ठरवलं. या माध्यमातून एका गावातून दोंघांची निवड करण्यात आली. मात्र करोनाच्या नियमांचे पालन (corona Rules And Regulations) करण्यावर भर देत शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमात मुलांना शिकविण्यास पुढाकार घेवून शिक्षकमित्रांनी विनामुल्य काम सुरु केलेे. त्यामुळे विद्यार्थ्याना शाळेसारखेच दररोज दोन तास शिक्षण मिळू लागले.

सध्या त्र्यंबक तालुक्यात (Trimbak taluka) दोनशे शिक्षक मित्र काम करीत असून एकूण अंदाजे ४०० मुले शिक्षण घेत आहे. हे शिक्षकमित्र युवक-युवती एखाद्या झाडाखाली, स्वत:च्या घरात वा समाजमंदिरात वर्ग भरवितात. करोना कालावधीत चिमुकली शिक्षणापासून वंचित नसल्याने पालक समाधानी आहेत. दरम्यान या आदिवासी भागातील (Trimbal Area) मुलांचेे शैक्षणिक नुकसान टळले आहे.

शिक्षकमित्र

गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली परतू कोरोना काळात प्रभावीपणे वापर झालेली संकल्पना म्हणजे शिक्षकमित्र होय. लॉकडाऊनच्या काळात आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे, याकरिता विद्यार्थी ज्या गावात, त्याठिकाणच्या शिक्षणाची आवड असणारा व किमान पाठ्यपुस्तकातील आशयज्ञानाची जाण असलेल्या, बारावी पास किंवा पदवीधर अशा व्यक्तीची निवड करण्यात आली. मुख्य म्हणजे यासाठी शिक्षकमित्रांना कोणतेही मानधन दिले जात नाही. विनामूल्य शिक्षण या ठिकाणी दिले जाते. हे शिक्षकमित्र विद्यार्थ्यांना शिकवताना मनोरंजनातून शिक्षण या शिक्षण पद्धतीचा अवलंब करताना दिसून येतात.

शिक्षक मित्रांचे आभार

शाळा बंद शिक्षण सुरु ही संकल्पना सर्व आदिवासी भागातील शाळासाठी रोल मॉडेल असून, शिक्षक मित्र तरुणांचेही आभार. या कोरोना काळात आदिवासी भागातील शिक्षण निरंतर चालू ठेवण्यासाठी सर्वांनी यात सहभागी होणे आवश्यक आहे. त्यामुळे आदिवासी भागात फार मोठा बद्दल घडून येईल.

- देवमन जगदाळे , सेवा निवृत्त शिक्षक शासकीय आश्रमशाळा देवरगाव

शिक्षणाची आवड होती, वेळही होता. त्यामुळे लॉकडाऊन काळात मुलांना शिकवण्यास चांगली संधी मिळाली. या काळात अध्यापनाची आवड निर्माण होऊन वेगवेगळ्या पद्धतीने कसं शिकवता येईल, याचेही तंत्र अवगत झाले.

-भगवान महाले, शिक्षक मित्र

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com