मनपा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सेवक गैरहजर

मनपा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सेवक गैरहजर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महानगर पालिकेचा (Nashik Municipal Corporation) 40 वा वर्धापन (Anniversary) दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाकडे अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांनी पाठ फिरविल्याने

या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा आयुक्त घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कालिदास कलामंदिर (Kalidas Kalamandir) सारखे सभागृह या कार्यक्रमाला रिकामे राहिल्याने आयुक्तांनी हा विषय गांभीर्याने घेतला असल्याचे समजते.

नाशिक महानगर पालिकेचा (Nashik Municipal Corporation) 40 वा वर्धापन दिन (Anniversary) साजरा करण्यात आला. या निमित्त रविवारी अधिकारी आणि कर्मचारी यांचे क्रिकेटचे सामने (Cricket matches) घेण्यात आले. त्यानंतर नाशिककरांसाठी (nashik) खास कालिदास कलामंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या कार्यक्रमाला महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनीच पाठ फिरविल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला विभागीय आयुक्तांपासून सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित असतांना महापालिकेचेच अधिकारी उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर हा कार्यक्रम सुद्धा सुरु करतांना तब्बल एक ते दिड तास उशिराने सुरु केल्याने सुद्धा आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com