धान्य वितरण अधिकारी कार्यालय आता जिल्हाधिकारी कार्यालय आवारात

धान्य वितरण अधिकारी कार्यालय आता जिल्हाधिकारी कार्यालय आवारात

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक (nashik) शहरातील गोरगरीब जनता व नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे धान्य वितरण अधिकारी कार्यालय (Office of Grain Distribution Officer) नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय (Collector's Office) परिसरात शिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन प्रशासकीय इमारतीत हे कार्यालय सुरू होणार आहे. याबाबत आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani farande) यांनी केलेल्या प्रयत्नांना यामुळे यश प्राप्त होणार आहे. शहरातील रेशन कार्ड (Ration Card) संदर्भातील समस्या, तसेच नवीन रेशन कार्ड घेणे इत्यादी कामासाठी नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालय (Nashik Road Divisional Commissioner Office) येथे वर्ग करण्यात आलेल्या धन्य वितरण अधिकारी कार्यालयात जावे लागत होते.

त्यामुळे रेशन कार्ड घेणाऱ्या नागरिकांचे अतोनात हाल होत होते. दोन ते अडीच वर्षांपूर्वी नाशिक रोड येथे वर्ग करण्यात आलेले कार्यालय पुन्हा नाशिक (nashik) येथे शिफ्ट व्हावे, म्हणून आमदार देवयानी फरांदे प्रयत्नशील होत्या. त्यांनी शासनाला याबाबत पत्र व्यवहार देखील केलेला होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीत हे कार्यालय शिफ्ट करण्याबाबत जिल्हाधिकारी गंगाधरन डी (Collector Gangadharan D), निवासी जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे (Resident Collector Bhagwat Doifode),

जिल्हा पुरवठा नरसिंगे, धन्य पुरवठा अधिकारी पवार, तहसीलदार अनिल दोंदे यांच्या समवेत कार्यालयाची पाहणी करून कार्यालय ठिकाणी शिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक शहरातील नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यालयातूनच रेशन कार्ड उपलब्ध होणार आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आल्याबद्दल रेशन कार्ड लाभधारकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com