कार्यालय फोडून पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास

इंदिरा नगर परिसरातील घटना
कार्यालय फोडून पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास

नाशिक | Nashik

डेअरी कंपनीचे कार्यालय (Deary Company Office) फोडून चोरट्यांनी रोकड व तुपाचे डबे असा १ लाख ८५ हजार ८६४ रूपयांचा (Theft) मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि.३) रात्री इंदिरानगर परिसरात (Indiranagar Area) घडली.

याप्रकरणी दिपक दिलीप आव्हाड (रा. दत्तचौक, गंगापुररोड) यांनी तक्रार (Case Filed) दाखल केली आहे. त्यानुसार राजीवनगर येथे पॉवर डेअरी लिमीटेड या कंपनीचे कार्यालय आहे.

शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी (Unknown thief) कार्यालयाचे मागील बाजुने पत्रा तोडून कार्यालयात प्रवेश केला. येथील टेबलच्या ड्रावरमध्ये असलेली १ लाख ७५ हजार २४४ रूपयांची रोकड व १० हजार ६२० रूपये किंमतीचे तुपाचे डबे ( Cans of ghee) असे एकुण १ लाख ८५ हजार ८६४ रूपयांचे साहित्य चोरून नेले.

याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक ए. व्ही. उघडे करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com