नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; 'या' विषयावर झाली चर्चा

नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; 'या' विषयावर झाली चर्चा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये (Nashik Graduate Constituency Elections) दिवसेंदिवस चुरस वाढत आहे. त्यातच आज मुंबईत (Mumbai) नवीन घडामोडी घडल्या असून अपक्ष उमेदवारी करणाऱ्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी थेट मातोश्रीवर पोहोचून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न केले.

तसेच आज मातोश्रीवर नाशिकच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना देखील पाचारण करण्यात आले होते. यावेळी नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली असून लवकरच पक्षप्रमुख अंतिम निर्णय जाहीर करतील, अशी माहिती नाशिकचे ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर विनायक पांडे (Vinayak Pandey) यांनी 'देशदूत' शी बोलताना दिली.

काँग्रेसचे (Congress) अधिकृत उमेदवार तसेच मागील तेरा वर्षापासून आमदार असलेले संगमनेरचे डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांना पक्षाने पुन्हा अधिकृत उमेदवारी जाहीर करून एबी फॉर्म देखील दिला होता, मात्र अर्ज दाखल करण्याच्या काहीक्षण अगोदरच त्यांनी अर्ज न भरता त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात नवा ट्विस्ट निर्माण झाला होता. तर सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी मी काँग्रेसचा कार्यकर्ता असून अपक्ष उमेदवारी करत असल्यामुळे भाजपासह (BJP) सर्व पक्षांच्या नेत्यांकडे जाऊन मला पाठिंबा द्यावा, अशी विनंती करणार असल्याचे म्हटले होते.

यानंतर नाशिकपासून मुंबईपर्यंत राजकीय घडामोडी होत आहे. आज त्याच्यात आणखी एक नवीन ट्विस्ट निर्माण झाला. पूर्वीच्या भाजपच्या असलेल्या व सध्या पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करणाऱ्या शुभांगी पाटील यांनी थेट मातोश्री गाठत मला पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली.

तसेच मातोश्री वरून बोलावणे आल्याने नाशिकमधील सेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर (Vijay Karanjkar) माजी महापौर विनायक पांडे, संपर्कप्रमुख सुनील बागुल, महानगरप्रमुख माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, महापालिका माजी गटनेता विलास शिंदे यांच्यासह आदींनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली.

त्यानंतर संपर्कप्रमुख बागुल यांनी सांगितले, की काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे असताना त्यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यांच्याऐवजी पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आम्ही शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून अंतिम निर्णय मातोश्रीवरून होणार असल्याचे ते म्हणाले.

महाविकास आघाडीचा उमेदवार कोण?

माघारीची मुदत १६ जानेवारी अर्थात सोमवारी दुपारपर्यंत आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात अजून काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच सत्यजित तांबे यांनी खेळलेला डाव त्यांच्या अंगावर पलटतो की अजून काही नवीन घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तसेच शुभांगी पाटील या महिला उमेदवार असून आतापर्यंत नाशिकच्या पदवीधर मतदारसंघात महिला आमदार (MLA) झालेले नाही. त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ महाविकास आघाडीने जर पाटील यांना पाठिंबा दिला तर त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार होणार असल्याने आगामी निवडणूक (Election) अत्यंत रोचक ठरेल यात शंका नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com