अश्लिल फोटो ट्रू कॉलरवर टाकल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा

अश्लिल फोटो ट्रू कॉलरवर टाकल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा

नाशिक | Nashik

मोबाइलवर अश्लिल फोटो, मेसेज पाठवून दाम्पत्याचे फोटो ट्रु कॉलरवर टाकणार्‍या महिलेविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले.

तपोवन रोडवरील ५० वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार एका महिलेने आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन ऑगस्ट 2020 पासून व्हॉट्सअपवर अश्लिल मेसेज, शिवीगाळ केली.

तसेच त्या व्यक्तीसोबत त्याच्या पत्नीचे फोटो मॉर्फ करुन नावासह प्रसारीत केले आहेत.

याप्रकरणी सायबर पोलीस तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com