अंबड : कंपनी व्यवस्थापकावर विनयभंगाचा गुन्हा

अंबड : कंपनी व्यवस्थापकावर विनयभंगाचा गुन्हा

नाशिक | Nashik

सहायक महिलेचा वेळोवेळी विनयभंग केल्याप्रकरणी एका कंपनीच्या व्यवसाय व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुमुद कुमार शर्मा असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी पिडीतेने पोलीस ठाण्यात त्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अंबड औद्योगिक वसाहतीतील बी.जी. क्रायोजिक कंपनीच्या शाखेत ऑगस्ट १५ पासून ते आतापर्यंत वेळोवेळी हा प्रकार घडला.

शर्मा हे कामाच्या निमित्ताने वेळोवेळी पिडीतेला अश्‍लिल बोलत असत. तसेच कार्यालयात पिडीतेचा हात पकडून तसेच वेळोवेळी जवळ बसत जा असे म्हणुन त्यांचा विनयभंग केला.

ही बाब सहन न झाल्याने पिडीतने पतीला याबाबत माहिती देऊन अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली आहे. अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com