घनकर गल्ली वाडा प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा

घनकर गल्ली वाडा प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा

नाशिक । Nashik

घनकर गल्ली (Ghankar Len) येथील वाड्याची भिंत (Wada Wall Collesped) कोसळून दोन महिला गंभीर जखमी (Two Injured) झाल्याची घटना शनिवारी (दि.3) सायंकाळच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात (Sarkarwada Police Thane) जागामालकासह बांधकाम करणारा ठेकेदार (contractor) आणि पोकलँड चालकाविरोधात (Pokland driver0 गुन्हा दाखल (Case Filed) करण्यात आला आहे.

घनकर गल्ली येथे संजय जोशी (Sanjay Joshi) यांनी त्यांच्या वाड्याचे नुतनीकरण (Renovation of the Wada) सुरु केले होते. त्यासाठी त्यांनी वाडा पाडून खोदकाम सुरु केले होते. त्यामुळे त्यांच्या वाड्याला खेटून असलेले इतर वाडे धोकादायक झाले. त्यापैकी वैश्य कुटूंबियांनी जोशी यांना बांधकाम न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी काम सुरु ठेवल्याचा आरोप वैश्य कुटूंबियांनी केला. त्यातच शनिवारी वैश्य यांच्या वाड्याची भिंत कोसळून संगीता अजित वैश्य (55) व रिटा अभिषेक वैश्य (27) या जखमी झाल्या.

याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री वाडा मालक जोशी यांच्यासह ठेकेदार आणि चालकाविरोधात बेजबाबदार कृत्यामुळे भींत कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सरकारवाडा पोलिस तपास करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com