ओढ्याचा पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार

ओढ्याचा पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ओढा (Odha) ते एकलहरा (Eklahara) गाव यांना जोडणाऱ्या पूलाचे (Bridge) 90 टक्के काम पूर्ण झालेले आहे. फक्त दोन्ही बाजूला भर टाकणे, त्यावर डांबरीकरण करणे व उदघाटन करून वाहतूक सुरू करणे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला (Public Works Department) दोन ते तीन महिन्यापासून वेळ नाही का? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे...

ओढा गाव ते एकलहरा व मातोश्री कॉलेज यांना जोडणारा हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने सुरू होणे अतिशय महत्त्वाचे आहे.यामुळे दोन्ही गावाचा संपर्क वाहतुकीपासून तुटलेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मातोश्री कॉलेजचे सर्व विद्यार्थी यांचे हा पूल नसल्यामुळे अतोनात हाल होत आहेत.

गावकऱ्यांना व विद्यार्थ्यांना मातोश्री कॉलेजला किमान चार किलोमीटर दूर अंतरावरून जावे लागत आहे.त्यामुळे नागरिक व विद्यार्थी अत्यंत त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावरून अनेक वेळा अपघात देखील झालेले आहे.याबाबत वेळोवेळी सर्व संघटनांकडून लेखी निवेदन देऊन देखील सदरचा पूल रहदारीसाठी सुरू होत नसल्याने संघटनांकडून आंदोलन अथवा उपोषण करण्याचा इशारा पीडब्ल्यूडी विभागाला दिलेला आहे.

निधी उपलब्ध असून देखील व कार्यारंभ आदेशामध्ये नमूद केलेल्या मुदतीत पूल पूर्ण न केल्याने त्यावर सदर मक्तेदारावर संबंधित विभाग काय कारवाई करते?याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. मातोश्री कॉलेजचे विद्यार्थी व पालक देखील आंदोलनाच्या तयारीत आहे.

ओढ्याचा पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार
जि. प. कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूक : आपलं-सहकार पॅनलकडून आरोपांच्या फैरी

याबाबत ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी केंद्रीय दिशा समितीचे अशासकीय सदस्य राहुल केदारे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी दूरध्वनीवरून सदर कार्यक्षेत्रातील पुलाच्या संबंधित पीडब्ल्यूडीचे शाखा अभियंता शेळके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फक्त लवकरच वाहतुकीसाठी चालू होईल असे उत्तर दिले.

त्यामुळे त्यांनी देखील सदरचा प्रश्न हा केंद्रीय दिशा समितीच्या बैठकीत केंद्रीय मंत्री तथा अध्यक्षा दिशा समिती डॉ. भारती पवार (Dr. Bharti pawar) यांच्याकडे उपस्थित करण्याचे संकेत दिले आहेत. या भागातील लोकप्रतिनिधींचे सुद्धा याकडे दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी होते आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जागे होतात किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com