डोंगरगावपर्यंत पाणी पोहचविण्याचे उद्दिष्ट

पालकमंत्री भुजबळ : कालव्याची पाहणी
डोंगरगावपर्यंत पाणी पोहचविण्याचे उद्दिष्ट

नाशिक । Nashik

मांजरपाडा प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असून यंदाच्या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने पाणी येवल्याच्या दिशेने येणार आहे. पावसळ्यात येणारे हे पाणी डोंगरगाव पर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट असून पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्यामध्ये येणाऱ्या रेल्वे क्रॉसिंगचे काम महिनाभरात पूर्ण करण्यात यावे,असे आदेश पालकमंत्री छगन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पालकमंत्री भुजबळ यांनी रविवारी (दि.३०) पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याची येवला तालुक्यातील कुसुर आणि कुसमाडी शिवारात पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधकिसन सोनवणे, येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार,पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, अधीक्षक अभियंता अ.रा. नाईक, कार्यकारी अभियंता रा.अ.शिंपी,यांत्रिक विभागाचे कार्यकारी अभियंता जे एम पाटील, उपअभियंता जे.डी. सोनवणे,मयूर सोनवणे, स्वप्नील पाटील, प्रांताधिकारी सोपान कासार, तहसिलदार प्रमोद हिले, दीपक लोणारी यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

मांजरपाडा प्रकल्पाचे काम पूर्णत्वास असून यंदाच्या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने पाणी येवल्याच्या दिशेने येणार आहे. त्यादृष्टीने पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या साफसफाईचे काम तातडीने सुरू आहे. मात्र अद्याप रेल्वे क्रॉसिंगचे काम राहिले आहे. या कामास रेल्वेची परवानगी मिळाली असून या कामाची भुजबळ यांनी अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली.

भुजबळ म्हणाले की, मांजरपाडा प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असून यंदाच्या पावसाळ्यात कुठल्याही परिस्थितीत डोंगरगाव पर्यंत पाणी पोहचविण्याचे आपले उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने कालव्याच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करून महिनाभराच्या आत कुसमाडी परिसरातील रेल्वे क्रॉसिंगचे कामे महिनाभराच्या आत पूर्ण करण्यात यावे.

तसेच कालवा परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणी नुसार आवश्यक ती कामे तातडीने पूर्ण करून देण्याची यावी असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे यंदाच्या पावसळ्यात डोंगरगाव पर्यंत पाणी पोहचणार असून येवलावासीयांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com