दिंडोरी l Dindori (प्रतिनिधी)

दिंडोरी नगरपंचायतीच्या मतदार यादया प्रसिदध झाल्यानंतर आज हरकतीच्या शेवटच्या दिवशी ९५० हरकतींचा पाऊस पडला असुन सुमारे १५०० मतदारांच्या नावांच्या तक्रारी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदार यादी प्रभागनिहाय प्रसिध्द करण्यात आली होती. मतदार यादया पाहिल्यानंतर सर्वच प्रभागात खळबळ उडाली होती. निवडणुक आयोगाच्या कार्यक्षमतेवर दिंडोरी शहरात चर्चा झाली. कारण या मतदार यादया पाहिल्यानंतर सर्वच मतदार यादयांमध्ये घोळ दिसुन आले. मतदार यादया करतांना बुथ निरीक्षक कर्मचार्यांनी कार्यालयात बसुनच यादया बनवल्या की काय याबाबत शंका निर्माण होत आहे. मतदारांना आपली नावे शोधण्यात बराच वेळ गेला.

त्यात काहींनी हरकत घेतांना काही मतदारांकडुन ओळखपत्र घेण्याचा प्रयत्न केला. काहींनी राजकिय डावपेच म्हणुन मतदारांची मते इकडे तिकडे केली. त्यामुळे पारदर्शक पदधतीने काम करण्याचे मोठे आवाहन नगरपंचायत प्रशासक आणि मुख्याधिकारी यांच्यावर आहे. शहरातील चर्चेनुसार प्रशासक डॉ. आहेर व मुख्याधिकारी नागेश येवले हे अत्यत नियमानुसार कर्मचार्यांकडुन कामे करुन घेणारे अधिकारी आहेत, त्यामुळे ते सर्व अर्ज आणि त्यातील स्वाक्षर्या तपासुन व प्रत्यक्षात घरोघरी जाऊनच मतदारांच्या हरकतींवर निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.

सध्या ९५० हरकती जरी प्राप्त झाल्या असल्या तरी त्यातील प्रत्येक प्रभागाच्या रचनेनुसार मतदार यादया ठेवण्याची अपेक्षा आहे. कारण कुणी कर्मचार्यांची दिशाभुल करण्याची शक्यता आहे. मृत व्यक्तिंची नावे तर तशीच ठेवण्यात आली आहे. अनेक वर्षांपासुन कामे करणार्या व्यक्तींकडुन जर मतदार यादीत फेरफार झाला असेल तर ती बाब विचार करण्यासारखी असुन प्रशासनानेे यावर कडक निर्णय घेणे अपेक्षित आहे.